एखादी झुंडभाषा अनैसर्गिकरित्या ‘राष्ट्रीय’ ठरवून तिचा ‘अडाण्याचा गाडा’ अन्य भाषांवर फिरवून त्या भुईसपाट करणे, हे ‘भाषिक माफियागिरी’पेक्षा काय वेगळे आहे?
मराठी ही आपली आई असून हिंदी ही आपली पूतनामावशी आहे, हे महाराष्ट्राने जराही विसरता कामा नये. हिंदीसक्तीच्या अश्वमेधाचा चौखूर उधळू पाहाणारा हा उन्मत्त घोडा महाराष्ट्रातच अडवून तातडीने हाकलून दिला पाहिजे, अन्यथा भारत देश हिंदीच्या मोगलाईत सापडण्याची चिन्हे आहेत. भारत विरुद्ध हे नवहिंदाड पावटे, असा हा लढा आहे आणि तो लढण्यासाठी मराठीला स्वतःची रणनीती हवी!.......